तुझ्या भावनांचा कुणी गैरफायदा घेण्यापूर्वीच सावध हो....

English

28th Dec 2014 च्या YEP वर्कशॉप मधील युवकांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद...

प्रिय क्ष,
तू खूप लवकर कुणावरही विश्वास ठेवतेस, ही कित्ती चांगली गोष्ट आहे मात्र हां.. कुणालाही चांगलं किंवा वाईट असे लेबल लावण्यापूर्वी निश्चीतच आपल्याला त्याच्या विषयी जास्तीची माहिती मिळवावी लागेल की नाही? आपल्या आणि त्या मित्र किंवा मैत्रिणीतील मैत्री थोडी जमवावी लागेल का नाही. तुझ्यात किती चांगला गुण आहे की तू लोकांना लगेच आपलं करु शकतेस मात्र तरीही लोकांनी, मित्रांनी तुला दगा दिलाय म्हणुन तू व्यथीत आहेस.. मला कळतंय पण अगं वेडे.. ह्यापुढे थोडं सावध रहा.. मैत्री मध्ये आपलं सर्वस्व लावून नंतर त्रास करुन घेतल्या पेक्षा थोडी सावधगिरी नको का बाळगायला...
आणि लोकं तुला खात जा थोडी जाड हो म्हणतात ना तर त्यांना म्हणू देत त्यांची काळजी करु नकोस इथं लोकं चांगल्याला-वाईट आणि वाईटाला-चांगलं ठरवण्यात आपलं आख्खं जीवन घालवत असतात, तू कशीही असलिस तरी तुला लोकं नांवं ठेवतीलच म्हणून ऐक तू तूझं जीवन जग, तुझ्या पध्दतीनं ... ह्याच्या त्याच्या म्हणण्यवर गेलीस तर तू जगूच शकणार नाहिस... कळलं
मोबाईल वर चॅटिंग करणं तुला अभ्यासा पेक्षा जास्त आवडतं हे मात्र जरा जास्तच होतंय हं... अगं अभ्यास करणार नाहिस वेळेवर तर पास कशी होशील... तुझ्या आणि आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण कशी करशील? आणि एकदा परिक्षा संपली की... अभ्यास संपला की आयुष्यभर ते टेक्सटिंग आणि चॅटिंग असणारच आहे ना?
आणि हो अननोन नंबर्स वरुन येणारे रिक्वेस्ट घेत जाउन नकोस, पलिकडील व्यक्ती कोण आहे हे जाणुन घेतल्या शिवाय त्या व्यक्तिशी बोलत जाउ नकोस उद्या पलिकडील व्यक्ति जर एखाद्या आतंकवादी संघटनांशी संबंधीत असली तर त्याची जबाबदारी कोण घेईल.. अगं वेडे.. ताबडतोब ह्या प्रकारच्या अनभिज्ञ माणंसांसोबतच्या, नंबर सोबतच्या व्यक्तिंशी टेक्स्टींग पूर्ण पणे बंद कर.
तू ज्या व्यक्तिच्या शोधात आहेत म्हणजे तुला समजून घेउ शकणार असलेल्या, ती व्यक्ति निश्चित तुझ्या जीवनांत येईल पण त्यासाठी तुझ्या मोबाईल येत असलेल्या अननोन रिक्वेस्ट घेउन तू जर त्यांच्या सोबत टेक्स्टिंग करत असशिल तर तू स्वतःसाठी दुःखाला निमंत्रण देतीयेस हे लक्षात ठेव. जग सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे नसते गं... जगात सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखे कोणी भेटत नसते, तुझ्या याच फॅंटसी चा लोकं फायदा घेतील आणि तुला याचा त्रास होउ शकेल.. भानावर ये आणि जगा कडे उघड्या डोळ्यांनी पहायला शिक.
ज्या लोकांशी तू बोलतेस त्यांना तुझ्या समस्या, अडचणींशी काय घेणं देणं? थोडा विचार कर आणि तुला कधी वाटलंच कांही शेअर करायचे आहे तर माझ्या या मेल अॅड्रेस वर मला मेल टाक.. अगं वेडे.. तुझ्या शेअरींग साठीच तर आम्ही परवा YEP घेतला होता ना?
तेव्हां मॅडम आता हसा .. एक स्माईल द्या आणि पूर्ण मरगळ झटकून अभ्यासाला लागा... जेव्हां वाटेल तेव्हा पुरोहित काका आहेत शेअरींग ला .. ओके?

Follow us on:

 
 
 
Back to Top