हॅकिंग करा आणि चरितार्थ ही चालवा…

Photo by Pixabay from Pexels: https://www.pexels.com/photo/turned-on-computer-monitor-displaying-text-270360/

हॅकिंग हा शब्द ऐकला की अनेकांना धडकीच भरते. हॅकिंग या शब्दाचा सरळ संबंध कायद्याशी येत असल्यामुळे अनेक जण हॅकिंग हा शब्द वापरला की थोडेसे सावध होतात. पण़ आज आपण कायदेशिर हॅकिंग या विषयीच जाणुन घेणार आहोत. हॅकिंग करणे म्हणजे साधारण काम नव्हे हा विचार ध्यानी असु द्यात. कारण ज्याचे संगणक हॅक करावयाचे आहे त्याविषयी हॅकरला सुरवातीला जाणीवच नसते मग तो आधी सगळी माहिती गोळा करतो आणि मग हॅकिंग चा प्रयत्न करत असतो.

सुरुवातीला हॅकर्स मंडळींनी आयटी क्षेत्रांत धुमाकुळ घातला होता. मात्र जसे जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे हॅकिंग होउ नये म्हणुन ज्या कांही दक्षता घ्याव्या लागतात त्यांच्या अंमलबजावणी साठी, त्यांच्या तपासणीसाठी व त्यांच्या आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी आताशा सर्टिफाईड एथीकल हॅकर हे मानांकन आज उपलब्ध झाले आहे.

विविध बँका, आयटी कंपन्या, आणि संस्था या सर्टिफाईड हॅकर्स ना आपल्या कंपनीच्या वेबसाईट, आपल्या कंपनीचे नेटवर्क अधिकृतरित्या हॅक करण्यासाठी पगार देत असतात. त्याद्वारे खर्‍या हॅकर पासुन त्यांचे नेटवर्क सुरक्षीत राखण्याची हमी मात्र एथीकल हॅकरला द्यावी लागत असते.

हॅकिंग करणारी मंडळी नेहमीच हॅकिंग च्या वेगवेगळया पध्दती शोधून एका सुरक्षीत प्रणालीत स्वतःचा शिरकाव करता येतो का ते पहात असतात अशा वेळी सर्टिफाईड हॅकरला त्या सुरक्षीत प्रणालीला विविध प्रकारे टेस्ट करुन ती प्रणाली खरोखर सुरक्षीत आहे का नाही हे पहावे लागत असते.

सर्टिफाईड हॅकर म्हणुन कार्य करत असतांना तुम्हांला स्वतःला सतत टेक्नोलॉजी ने अद्ययावत ठेवावे लागेल, नवनविन उपकरणं, सॉफ्टवेअर्स व त्यांच्या उपयोगाने स्वतःची प्रगती साधत रहावी लागणार आहे. टेक्नोलॉजीच्या अद्ययावतपणा साठी सतत परिश्रम करुन, स्वतःच्या प्रगतीसोबत तुम्हांसोबत करार केलेल्या कंपनीचे नेटवर्क तुम्हांला सुरक्षीत ठेवावे लागणार आहे.

काय शिकाल?

आयटी क्षेत्रांत सध्या प्रचंड मागणी असलेल्या या क्षेत्रांसाठी जर तुमची खरोखर ईच्छा असेल तर हार्डवेअर, नेटवर्किंगच्या मुलभूत संकल्पनांचे अतिशय उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त विविध ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हांला कार्य करता यायला पाहिजे. यात प्रामुख्याने तुम्हांला युनिक्स, लिनक्स या ऑपरेटिंग सह टिसीपी/आयपी ह्या विषयावर तुमचे प्रभुत्व असायला पाहिजे. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेजवर ही प्रभुत्व असायला पाहिजे ज्यांत सीप्लसप्लस, पर्ल, रुबी, पायथॉन ह्या विशेष भाषा आहेत.

बारावी नंतर ची संगणक किंवा ईन्फॉरमेशन क्षेत्रांतील ग्रॅजुएट डिग्री   म्हणजे इंजीनियरींग किंवा बीएससी नंतर एमएससी किंवा एमसीए करुनही तुम्ही ह्या क्षेत्रांत शिरकांव करण्यासाठी प्रोफेशनल कोर्स करु शकता.

कोणते प्रोफेशनल सर्टिफिकेशन करताल?

या क्षेत्रांत व्यवस्थीत स्थायीक होण्यासाठी तुम्हांला खालील सर्टिफिकेशन करावे लागतील ज्यांत

सर्टिफाईड एथीकल हॅकर (CEH)

कॉम्प्युटर हॅकिंग फोरेन्सिक इनवेस्टीगेटर (CHFI)

सिस्टीम सेक्युरीटी सर्टिफाईड प्रॅक्टीशनर (SSCP)

सर्टिफाईड ईन्फॉरमेशन सिस्टीम्स सेक्युरीटी प्रोफेशनल (CISSP)

जीआयएसी सेक्युरीटी प्रोफेशनल (GSEC)

सर्टिफाईड फोरेंसिक अ‍ॅनालिस्ट (GCFA)

सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट-सेक्युरीटी(CCNA-SEC)

सिस्को सर्टिफाईड नेटवर्क प्रोफेशनल-सेक्युरीटी(CCNP)

कसल्या संधी मिळतील?

संपूर्ण जगभरातून ईंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कित्येक पटीनं वाढत आहे आणि त्यासोबत वाढत आहे सायबर क्राईम च्या घटना. असे असतांना आयटी सिस्टीम सेक्युरीटी प्रोफेशनलची मागणी गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते वॉशिंग्टन पर्यंत सगळी कडे असणार आहेच.

या व्यतिरिक्त बँका, शासकिय कार्यालयं, वित्त संस्था, आयटी युनिटस्, हॉटेल, एअरलाईन्स कुठं म्हणुन तुमची मागणी नसणार आहे कल्पना करा.

किती पगार अपेक्षीत कराल?

नवखा म्हणुन साधारणतः 3 लाखा पासुन तुमचे पॅकेज सुरु होईल ते प्रोफेशनली कांही वर्षांच्या अनुभवी हॅकरचे पॅकेज 15-20 लाखांपर्यंत असते.

मनोज पुरोहित

करियर कौन्सेलर, समुपदेशक

वरिष्ठ आयटी तज्ञ Certified Ethical Hacker by IIT, Powai

9422170112 / 8308502590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *